कोल्हापूर जिल्हा पर्यटन स्थळे |20 Best Tourist Places in kolhapur Distict

Contents hide

Tourist places in kolhapur District | कोल्हापूर जिल्हा पर्यटन स्थळे

Tourist places in kolhapur District | कोल्हापूर जिल्हा पर्यटन स्थळे : निसर्ग सौंदर्य व ऐतिहासिक स्थळामुळे कोल्हापूर जिल्हा पर्यटकांचे आवडते ठिकाण आहे. सर्व प्रकारच्या पर्यटन सुविधा जिल्ह्यात उपलब्ध आहेत. या लेखात आपण Tourist places in kolhapur District | कोल्हापूर जिल्हा पर्यटन स्थळे याबाबत सविस्तर माहिती बघणार आहोत.

कोल्हापूर जिल्हा ऐतिहासिक ठिकाणे | Historical Places in Kolhapur

विशाळगड | Tourist Places in kolhapur

कोल्हापूरच्या वायव्येस 72 कि. मी. अंतरावर विशाळगड हा किल्ला आहे. किल्ल्याचे बांधकाम ‘राजा भोज’ याने केलेले आहे. शिलाहार यादव बहमनी व त्यानंतर छत्रपती शिवरायांच्या साम्राज्यात हा किल्ला आला. गडावर तटबंदी बुरुज, प्रतिनिधींचा वाडा, अर्धचंद्र विहीर इत्यादी ठिकाणे आहेत. वीर बाजीप्रभू देशपांडे व फुलाजी यांच्या समाध्या या गडावर आहेत.

पावनखिंड |घोडखिंड | Best Tourist Places in kolhapur

पन्हाळ्याच्या वेढ्यातून शिवाजी महाराज विशाळगडाकडे पावनखिंड या मार्गाने गेले. या ठिकाणी गनिमांना बाजीप्रभू देशपांडे यांनी रोखून धरले. शिवरायांच्या स्वराज्याच्या रक्षणासाठी बाजीप्रभूंनी येथे बलिदान दिले. बाजीप्रभूंच्या बलिदानामुळे घोडखिंड पावनखिंड म्हणून ओळखली जाऊ लागली.

पन्हाळगड

कोल्हापूर पासून 19 कि. मी. अंतरावर पन्हाळगड (पन्हाळा) किल्ला व थंड हवेचे ठिकाण आहे. अनेक राजवटींबरोबरच शिवरायांच्या साम्राज्यातील हा महत्त्वाचा किल्ला आहे. आज गडावर बालेकिल्ला, धान्य कोठारे, धर्मकोठी, तालिमखाना इत्यादी अस्तित्वात आहेत.

मसाई लेणी

मसाई पठारावर अर्धवर्तुळाकार कड्यात मसाई लेणी या प्राचीन लेणी आहेत. या लेणी समुहात पाण्याची टाकी, गुहा, विहिरी, चैत्यगृह इत्यादी भाग आहेत. गाभाऱ्यात स्तूप आहे. कोकणातून घाटावर येण्याच्या मार्गातील या लेण्या अनेक ऐतिहासिक संदर्भ उलगडतात.

पावनगड

कोल्हापूर पासून पन्हाळ्याकडे जाताना 17 कि. मी. अंतरावर पावनगड हा किल्ला आहे. या किल्ल्यास पन्हाळ्याच्या जोड किल्ला म्हणून देखील ओळखले जाते. छत्रपती शिवरायांनी बांधलेला हा जिल्ह्यातील एकमेव किल्ला आहे. गडाभोवती तटबंदी, बुरूज, मंदिर इत्यादी ठिकाणे येथे आहेत. सभोवतालच्या निसर्ग सौंदर्यामुळे हा परिसर रमणीय आहे.

शिवा काशीद समाधी पन्हाळा

सिद्धी जोहरच्या वेढ्यातून सुटकेसाठी प्रतिशिवाजी होऊन शिवरायांना मदत करणारे वीर शिवा काशीद कामी आले. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांची समाधी येथे बांधण्यात आलेली आहे. गडावर प्रवेश करतांना चार दरवाजे लगत त्यांचा पुतळा आहे.

भुदरगड किल्ला

कोल्हापूरच्या दक्षिणेस 58 कि. मी. अंतरावर भुदरगड किल्ला हा किल्ला आहे. सन 1967 मध्ये छत्रपती शिवरायांनी या किल्ल्याची दुरुस्ती केली. किल्ल्यावर केदारलिंग जाखुबाई भैरवाचे मंदिर आहे.

कुंभोज | बाहुबली

कोल्हापूरच्या ईशान्य दिशेस 29 कि. मी. अंतरावर बाहुबली हे तीर्थक्षेत्र आहे. या परिसरात तीनशे वर्षांपूर्वी मुनी श्री 108 बाहुबली महाराज यांचे वास्तव्य होते. येथे भगवान बाहुबलीची 12. 50 मीटर उंचीची संगमरवरी मूर्ती आहे. कर्मवीर भाऊराव पाटील यांचा जन्म दिनांक 22 सप्टेंबर 1887 येथे झाला. कर्मवीर विद्याप्रबोधिनी द्वारे चालवले जाणारे प्रशिक्षण केंद्र आहे.

गगनबावडा किल्ला

कोकणातून येणाऱ्या दोन मार्गाच्या दरम्यान गगनबावडा किल्ला हा किल्ला आहे. सद्यस्थितीत एक बुरुज व तटबंदी आहेत. गडाच्या तळाकडील भागात गुहा आहेत. गगनगिरी महाराजांचे वास्तव्याचे ठिकाण म्हणून परिचित आहे.

नेसरी – ‘वेडात मराठे वीर दौडले सात’

गडहिंग्लज पासून दक्षिणेस 18 कि. मी. अंतरावर नेसरी हे ठिकाण आहे. महाराजांचे सरसेनापती प्रतापराव गुजर यांची समाधी येथे आहे.

उमरानीच्या युद्धात बहलोलखान शरण आल्यामुळे त्याला जीवदान दिले, ही घटना महाराजांना आवडली नाही तेव्हा खानाचा नाश केल्याशिवाय तोंड दाखवू नका. असा आदेश मिळाल्यानंतर आपले सहा साथीदारांसह प्रतापरावांनी नेसरीच्या खिंडीत खानावर हल्ला चढवला आणि वेगात शत्रूवर तुटून पडलेली सात मराठी सरदार शहीद झाले. त्या ठिकाणी स्मारक बांधण्यात आले आहे.

चंदगड

कोल्हापूरच्या दक्षिणेस 135 कि. मी. अंतरावर व बेळगाव पासून 45 कि. मी. अंतरावर चंदगड हे ठिकाण आहे. पुरातन रवळनाथ मंदिरासाठी हे ठिकाण प्रसिद्ध आहे.

पारशी शीलालेख मंदिराची पुरातनता स्पष्ट करतो. जीर्ण आवस्तेतिल एक गडी येथे होती. 1750 मध्ये कोल्हापूरच्या राजांनी सदाशिव भाऊंना चंदगड, पारगड, कलानंदिगड हे किल्ले दिल्याचा उल्लेख आढळतो, काजू ,फणस, बटाटा, भात, औषधी वनस्पती येथे आढळतात.

गंधर्वगड

चंद्र गडाच्या पूर्वेस 07 कि. मी. अंतरावर गंधर्वगड हा किल्ला आहे. संरक्षणाची तटबंदी आता पूर्णतः मोडकळीस आलेली आहे. सन 1724 मध्ये सावंतवाडीच्या नाग सावंतने हा किल्ला बांधला. कोल्हापूरच्या राजाने तो जिंकून घेतला व पुन्हा सावंतांकडे दिल्याचा उल्लेख आहे.

पारगड

चंदगड पासून पश्चिमेला 45 कि. मी. अंतरावर पारगड हा किल्ला आहे. वस्ती असलेल्या या किल्ल्यावर जाण्यासाठी जांभा दगडात बांधलेली अरुंद वाट आहे. सुमारे सोळा हेक्टर परिसरात हा किल्ला बांधलेला आहे. किल्ल्याचा काही भाग आजही सुस्थितीत आहे. कोल्हापूर छत्रपतींनी 1749 मध्ये किल्ला सदाशिव भाऊंना इनाम दिला.

कोल्हापूर जिल्हा पर्यटन स्थळे | Kolhapur Visiting Places in Marathi |Tourist Places in kolhapur

चांदोली व्याघ्र प्रकल्प

जिल्ह्याच्या वायव्येस 70 कि. मी. अंतरावर चांदोली व्याघ्र प्रकल्प हा प्रकल्प आहे. या परिसरातील वाघांच्या वावरामुळे हे स्थळ संरक्षित केले आहे. युनेस्कोने या स्थळाचा समावेश जागतिक वारसा स्थळात केला आहे. 317.67 चौ. कि. मी. क्षेत्रावर हा चांदोली व्याघ्र प्रकल्प पसरलेला आहे.

ज्योतिबा

नवसाला पावणारा म्हणून प्रसिद्ध ज्योतिबा हे ठिकाण कोल्हापूर पासून 14 कि. मी. अंतरावर आहे. उत्तरेकडे यमाई देवीचे मंदिर व पाण्याची कुंड आहेत. ज्योतिबाचे मंदिर हेमाडपंथी वास्तुशैलीचे आहे. दरवर्षी चैत्र महिन्यात या ठिकाणी मोठी यात्रा भरते.

पांडवदरा

पन्हाळ्याच्या पश्चिमेस नऊ किमी अंतरावर पांडवदरा हे ठिकाण आहे. पावसाळ्यात या पठाराचे सौंदर्य अद्वितीय असते. सभोवतालच्या दऱ्या व कासारी, वारणेचे अनेक प्रवाह पाहता येतात.

वारणा उद्योग समूह वारणानगर

वारणा हे आशियातील पहिले वायर व्हिलेज म्हणून ओळखले जाते. अनेक सहकारी तत्वातील संस्था वारणा समूहाशी संलग्न आहेत. वारणा समूहातर्फे दर्जेदार दूध उत्पादने, साखर इत्यादी चे उत्पादन केले जाते. वारणा समूहाने या परिसराच्या विकासात मोठी भूमिका बजावलेली आहेत.

पळसंबा

नदीपात्रात सुमारे 30 ते 35 फूट उंच व 50 फुटांचा घेर असलेल्या दगडात कोरलेली सुंदर मंदिरे पळसंबा येथे आहेत. बौद्ध कालीन मंदिरे व धबधब्यांमुळे परिसर सुंदर बनलेला आहे. याशिवाय वन पर्यटनासाठी पडसाळी, पद्मावती, बोरबेट, मोर्जाई हा परिसर छान आहे. जल पर्यटनासाठी कोदे, कुंभी, धामणी धरण आहे, गगनबावडा च्या अलीकडे सांगशी हे ठिकाण असून येथील मंदिर प्रसिद्ध आहे.

राधानगरी अभयारण्य

राधानगरी अभयारण्य हे ठिकाण कोल्हापूर पासून 50 कि. मी. अंतरावर आहे. धरणाच्या पायथ्याशी भोगवती नदीकाठावर हे ठिकाण आहे. राधानगरी अभयारण्य व तीन धरणे राधानगरी काळम्मावाडी तुळशी ही वैशिष्ट्ये आहेत. जैवविविधता ही तालुक्याची खास ओळख आहे.

पालीची देवराई

भुदरगड या किल्ल्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर पालीची देवराई हे ठिकाण आहे. विविध प्रकारची वनसंपदा येथे आहे.

गारगोटी

भुदरगड तालुक्याचे मुख्यालय स्वातंत्र्य लढ्यातील बंडाचे महत्त्वाचे ठिकाण गारगोटी हे आहे. हुतात्मा स्मारक, वेदगंगा नदी घाट हे ठिकाणे आहेत. ग्रामीण विद्यापीठ मौनी विद्यापीठ हे शिक्षण केंद्र आहे.

पाटगाव मौनीमठ

वेदगंगा नदी काठावर कोल्हापूरच्या नैऋत्येस पाटगाव मौनीमठ हे प्रसिद्ध ठिकाण आहे. मौनी महाराजांचे हे समाधी स्थळ आहे. राज्याभिषेकानंतर च्या दक्षिण दिग्विजयात जाताना शिवप्रभुनी मौनी महाराजांची भेट घेतली.

रांगणा

कोल्हापूरच्या दक्षिणेस 70 कि. मी. अंतरावर रांगणा हा किल्ला आहे. गडाला तटबंदी, बुरुज, दरवाजे, पाण्याची टाकी आहेत. या परिसरात एक प्राचीन शिलालेख आहे. किल्ला परिसराचे सौंदर्य नजरेत भरते.

गडहिंग्लज

कोल्हापूरच्या अग्नेयेस 72 कि. मी. अंतरावर हिरण्यकेशी नदीवर गडहिंग्लज हे तालुक्याचे ठिकाण आहे. गावात कलेश्वराचे व उत्तरेस 05 कि. मी. अंतरावर काळभैरवाचे मंदिर आहे. इसवी सन 1700 मध्ये कापशीकर घराण्याने बांधलेला किल्ला होता.

सामानगड

गडहिंग्लज च्या एक कि. मी. अग्नेयास सामानगड हा किल्ला आहे. गडावर गाडीने जाता येते. तटबंदी वरून निसर्गरम्य परिसर न्याहाळता येतो. हा किल्ला बाराव्या शतकात राजा भोजने बांधला. छत्रपती शिवरायांनी सोळाशे 1674 साली हा किल्ला जिंकून घेतला व काही काळ वास्तव्य केले. गडावर दहा बुरूज, भवानी मंदिर, अंधारकोठडी, चोरखिंड इत्यादी ठिकाणे आहेत.

आळते

आळते हे वारणा खोऱ्यातील जुने प्रसिद्ध गाव आहे. आळता हा तांबडा रंग या गावात तयार केला जातो. येथे बिरदेवाची प्राचीन मंदिर असून प्रतिवर्षी यात्रा भरते. शिदोबा व धुळोबा ही कुणबी समाजाच्या देवतांची मंदिरे आहेत.

रामलिंग

रामलिंग हे खडकाळ टेकडीच्या दगडात कोरलेले देवस्थान आहे. ही गुहा असून आत मध्ये पाण्याची टाके आहेत. गणपती व शिवलिंगावर पाणी सतत ठिबकते बाजूस चार चौ.मी हेमाडपंती शिल्प आहे.

इचलकरंजी

महाराष्ट्राचे मॅचेस्टर म्हणून इचलकरंजी या शहरास ओळखले जाते. सूतगिरण्या, हातमाग, रंगीत कापड छपाई इत्यादी उद्योग कार्यरत आहेत. शहरात प्राचीन संस्थानिकांचा वाडा आहे.

कुरुंदवाड

कृष्णा पंचगंगा नदीच्या संगमावर कोल्हापूर पासून पूर्वेस 40 कि. मी. अंतरावर कुरुंदवाड हे गाव आहे. ही कुरूंदवाड संस्थानाची राजधानी म्हणून ओळखले जाते. संस्थानिकांचा वाडा राघोजी व विष्णूचे मंदिर ही ठळक वैशिष्ट्ये आहेत. खवा, पेढे, बासुंदी या पदार्थांसाठी हे ठिकाण प्रसिद्ध आहे.

खिद्रापूर

कोल्हापूरच्या आग्नेयेला 65 कि. मी. अंतरावर कृष्णा नदीकाठी खिद्रापूर हे ठिकाण आहे. शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना असलेले कोपेश्वर मंदिर येथे आहे. भारत सरकारने हे मंदिर संरक्षित केले आहे. मंदिर परिसरात प्राचीन शिलालेख आहे.

आम्हाला अशा आहे की आपल्याला या लेखा मधून Tourist places in kolhapur District | कोल्हापूर जिल्हा पर्यटन स्थळे बद्दल संपूर्ण माहिती मिळाली असेल. यांच्या ब्लॉग MymarathiGuru.com ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.

Tourist Places in kolhapur

Tourist Places in kolhapur

Tourist Places in kolhapur District

Tourist Places in kolhapur City

Tourist Places in kolhapur District

2 thoughts on “कोल्हापूर जिल्हा पर्यटन स्थळे |20 Best Tourist Places in kolhapur Distict”

Leave a Comment