पावसाळा निबंध मराठी | Pavsala marathi nibandh 2022

पावसाळा निबंध मराठी | Pavsala marathi nibandh – आज आपण या लेखात पावसाळा मराठी निबंध लिहिणार आहोत. पावसाळा आला म्हणजे लहान बाळांचे मजेचे दिवस सुरू होतात. निसर्गाचे सुंदर रूप पावसाळ्यात पहायला मिळते.

पावसाळा म्हटलं की आनंदाची पर्वणीच असते. पावसाळ्यात येणारे सणवार मुलांची मजा, शाळा सुरू होण्याची चाहूल, शेतकऱ्यांची पेरणीची लगबग असे एकंदरीत संपुर्ण वातावरणच उल्हासित आणि आनंदमयी झालेले असते. चला तर मित्रांनो आपण पावसाळा मराठी निबंध पाहू.

पावसाळा निबंध मराठी 5 ओळी | Pavsala nibandh in marathi 5 lines

पावसाळा निबंध मराठी 5 ओळी | Pavsala nibandh in marathi 5 lines खालील प्रमाणे.

 1. पावसाळा हा माझा आवडता ऋतू आहे.
 2. पावसाळा हा दरवर्षी जून महिन्यात येतो.
 3. पावसाळ्यात आम्ही खूप मजा करतो.
 4. पावसाळ्यात आम्ही कागदाच्या होड्या बनवतो. व त्या पाण्यात सोडतो.
 5. पावसाळ्यात खूप पाऊस पडतो.

पावसाळा निबंध मराठी 10 ओळी | Pavsala marathi nibandh 10 lines

पावसाळा निबंध मराठी 10 ओळी खालील प्रमाणे आहे.

 1. पावसाळा हा ऋतू माझा सर्वात जास्त आवडता ऋतू आहे.
 2. पावसाळा दरवर्षी जून महिन्यात येतो.
 3. पावसाळ्याच्या पहिल्या पावसात भिजायला खूप मजा येते.
 4. पावसाळ्यात सगळीकडे हिरवळ पसरते. जणू काही या धरणी मातेने हिरवा शालुच पांघरला आहे असे वाटते.
 5. पावसाळ्यात नदी नाले तुडुंब वाहतात.
 6. पावसाळा आला की शेतकऱ्याची पेरणीची लगबग सुरु होते.
 7. पहिला पाऊस पडला की शेतकरी पेरणी करतो.
 8. पावसाळ्यात आभाळात ढग दाटून येतात. सगळीकडे काळोख पसरतो, विजा कडकडायला लागतात.
 9. हे असे दृश्य पाहून मन प्रसन्न होऊन जाते.
 10. असा हा पावसाळा ऋतू मला खूप खूप आवडतो.

पावसाळा निबंध मराठी 15 ओळी | Pavsala marathi nibandh 15 lines

 1. पावसाळा हा माझ्या आवडत्या ऋतुंपैकी एक आहे.
 2. पावसाळा हा जून महिन्यात सुरू होतो.
 3. पावसाळ्यात खूप पाऊस पडतो.
 4. पावसाळ्यात सध्या सगळीकडे हिरवळ पसरली आहे.
 5. सगळीकडे छोटे छोटे गवत उगवले आहे. सर्व शेत हिरवेगार झाले आहे. सर्व डोंगर हिरवेगार झाले आहे. झाडांना नवीन पालवी फुटली आहे.
 6. पावसाळा म्हटलं की आनंदाची पर्वणीच असते.
 7. पावसाळ्यात येणारे सणवार मुलांची मजा, शाळा सुरू होण्याची चाहूल, शेतकऱ्यांची पेरणीची लगबग असे एकंदरीत संपुर्ण वातावरणच उल्हासित आणि आनंदमयी झालेले असते.
 8. पावसाळ्यात सध्या सगळीकडे हिरवळ पसरलेली असते.
 9. पावसाळ्यात सर्व डोंगर हिरवेगार होतात.
 10. असा हा पावसाळा ऋतु मला खूप आवडतो.

पावसाळा

आज तारीख 1 जुलै आहे, पावसाळा सुरू होऊन एक महिना उलटला. मृग नक्षत्र 7 जून ला सुरु झाले. तसेच पावसानेही हजेरी लावली. पहिला पाऊस पडला तसेच शेतकऱ्यांनी पेरणी केली.

पावसाळ्यात आम्ही मुलं कागदाच्या होड्या बनवतो व वाहणाऱ्या पाण्यात होड्या सोडतो. चिखलाच्या वेगवेगळ्या खेळणी आम्ही बनवतो. आमच्या शाळेत चिखलाच्या खेळण्यांची स्पर्धा ही घेतली जाते.

पावसाळ्यात सध्या सगळीकडे हिरवळ पसरली आहे. सगळीकडे छोटे छोटे गवत उगवले आहे. सर्व शेत हिरवेगार झाले आहे. सर्व डोंगर हिरवेगार झाले आहे. झाडांना नवीन पालवी फुटली आहे.

भारतात एका वर्षात साधारण तीन ऋतू असतात. हिवाळा, उन्हाळा आणि पावसाळा ही तीन ऋतू असतात. मला जर विचारले तर या तिन्ही ऋतुंपैकी मला पावसाळा हाच ऋतू सगळ्यात जास्त आवडतो.

पावसाळा ऋतू मला आवडण्याची काही कारणे म्हणजे पावसाळ्यात सर्वत्र पाऊस पडतो. सगळीकडे आनंदी वातावरण असते. सगळे शेतकरी आनंदी होऊन जातात. शाळा सुरू होते. सगळीकडे हिरवळ पसरलेली असते.

महत्त्वाची गोष्ट म्हणजे पावसाळ्यात येणार सणवार मला खूप आवडतात. पावसाळा सुरू झाला की आमरस पोळी बनवतात. सगळ्या पाहुण्यांना बोलावतात.

पावसाळ्यात गणपती बाप्पांचे आगमन होते. गणपती बाप्पा आले तर मग विचारूच नका त्या वेळी तर खूप मजा असते. मोदक लाडू खायला मजा येते. बाप्पाचे विसरजन करायला खूप मजा येते.

पावसाळा निबंध मराठी 100 शब्द | Pavsala nibandh in marathi 100 words

पावसाळ्यात खूप पाऊस पडतो. पावसाळा म्हटलं की आनंदाची पर्वणीच असते. पावसाळ्यात येणारे सणवार मुलांची मजा, शाळा सुरू होण्याची चाहूल, शेतकऱ्यांची पेरणीची लगबग असे एकंदरीत संपुर्ण वातावरणच उल्हासित आणि आनंदमयी झालेले असते.

काल रात्री खूप पाऊस पडला. विजा कडकडत होत्या. विजेचे रात्रीचे होणारे उजेड आम्ही बघत होतो. सकाळी उठल्या उठल्या मी व माझे मित्र आम्ही नदीवर गेलो. तर बघतो तर काय नदीला पूर आला होता. नदी दुथडी भरून वाहत होती. गावातले सगळे मोठी माणसं आम्हला नदीपासून लांब राहण्यास सांगत होते.

आम्ही घरी आलो तर आई बाबा पेरणीची तयारी करत होते. गावातले सगळे शेतकरी परवणीच्या तयारीला लागले होते. आता सगळी कडे हिरवे गवत उगवले होते. आमच्या गावा शेजारचे डोंगर सुद्धा हिरवेगार झाले होते.

धरणी मातेने सगळीकडे जणू हिरवा शालूच पांघरलेला आहे असे वाटत होते. असा हा पावसाळा ऋतू मला खूप खूप आवडतो.

पावसाळा निबंध मराठी 200 शब्द | Pavsala nibandh in marathi 200 words

कधीकधी पावसाचा खूप त्रास होतो. बाहेर पडता येत नाही. सतत छत्री घ्यावी लागते. तरीही मोठ्या पावसात कपडे भिजतात. दप्तर भिजते. सगळीकडे चिखल होतो.

मैदानात खेळता येत नाही. सायकल चालवता येत नाही. रस्त्यावर पाणी तुंबते. गाड्या अडकून पडतात. म्हणून मनात येते की पाऊस संपावर गेला तर खूप बरे होईल.

हा सर्व त्रास वाचेल. परंतु खरोखरच पाऊस संपावर गेला तर तर खरोखर अनर्थ होईल. नद्या विहिरी आटून जातील. प्यायला पाणी मिळणार नाही. जमीन तापून तिला भेगा पडतील.

सगळीकडे फक्त उन्हाळा असेल. सर्व वनस्पती नष्ट होतील. त्यामुळे माणसांचे व प्राण्यांचे हाल होतील. शिवाय पाऊस नसेल तर पावसात भिजण्याचा आनंद मिळणार नाही. इंद्रधनुष्य कधीच दिसणार नाही. पाऊस नसेल तर सगळी मजाच निघून जाईल.

पावसाळ्यात खूप पाऊस पडतो. पावसाळा म्हटलं की आनंदाची पर्वणीच असते. पावसाळ्यात येणारे सणवार मुलांची मजा, शाळा सुरू होण्याची चाहूल, शेतकऱ्यांची पेरणीची लगबग असे एकंदरीत संपुर्ण वातावरणच उल्हासित आणि आनंदमयी झालेले असते.

पावसाळ्यात सध्या सगळीकडे हिरवळ पसरली आहे. सगळीकडे छोटे छोटे गवत उगवले आहे. सर्व शेत हिरवेगार झाले आहे. सर्व डोंगर हिरवेगार झाले आहे. झाडांना नवीन पालवी फुटली आहे.

पावसाळा ऋतू मला आवडण्याची काही कारणे म्हणजे पावसाळ्यात सर्वत्र पाऊस पडतो. सगळीकडे आनंदी वातावरण असते. सगळे शेतकरी आनंदी होऊन जातात. शाळा सुरू होते. सगळीकडे हिरवळ पसरलेली असते.

भारतात एका वर्षात साधारण तीन ऋतू असतात. हिवाळा, उन्हाळा आणि पावसाळा ही तीन ऋतू असतात. मला जर विचारले तर या तिन्ही ऋतुंपैकी मला पावसाळा हाच ऋतू सगळ्यात जास्त आवडतो.

सारांश | Pavsala marathi nibandh | पावसाळा निबंध मराठी

वरील लेखात आपण Pavsala marathi nibandh | पावसाळा निबंध मराठी या बद्दल माहिती घेतली. पावसाळा तसा हा सर्वांचाच आवडता ऋतु आहे. आम्हाला आशा आहे की आपल्याला हा लेख आवडला असेल. या लेखबद्दल आपल्या काही सूचना, माहिती सांगायची असेल तर खाली comment नक्की करा. आमच्या mymarathiguru.com या ब्लॉग ला भेट दिल्याबद्दल आपले धन्यवाद.

1 thought on “पावसाळा निबंध मराठी | Pavsala marathi nibandh 2022”

Leave a Comment