माझी शाळा मराठी निबंध | Essay on My School in Marathi – Best

आज या लेखात आपण माझी शाळा मराठी निबंध |Essay on My School in Marathi या विषयावर एक निबंध लिहिणार आहोत. आपल्याला गुरुजींनी माझी शाळा मराठी निबंध |Essay on My School in Marathi या विषयावर निबंध लिहिण्यास सांगितले असेलच. चला तर माझ्या बाल मित्रांनो पाहूया हा निबंध.

माझी शाळा निबंध मराठी 10 ओळी

 1. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाचपीरवाडी हे आहे.
 2. माझी शाळा आमच्या गावात आहे.
 3. माझी शाळा खूप सुंदर आहे.
 4. माझ्या शाळेचे क्रीडांगण खूप मोठे आहे.
 5. तसेच माझ्या शाळेत एक बगीचा देखील आहे. त्यामध्ये रंगबेरंगी फुलांची झाडे आहेत.
 6. आमच्या शाळेचे मुख्याध्यपकांचे नाव श्री. जाधव हे आहे.
 7. आमच्या शाळेत सर्व शिक्षक चांगले आहेत परंतु माझ्या आवडत्या शिक्षिका श्रीमती. मिसाळ मॅडम ह्या आहेत.
 8. आमची शाळा सकाळी 9.00 वाजता भरते आणि संध्यकाळी 4.00 वाजता सुटते.
 9. आमच्या शाळेच्या मैदानात आम्हाला खेळण्यासाठी मोठी मोठी खेळणी आहेत.
 10. अशी ही माझी शाळा आहे, माझ्या शाळेत जायला मला खूप आवडते.

माझी शाळा निबंध 20 ओळी

 1. माझ्या शाळेचे नाव श्री. गणेश विद्यालय देवगाव(रंगारी) हे आहे.
 2. मी इयत्ता सातवी मध्ये शिकत आहे.
 3. माझी शाळा माझ्या घरापासून जवळच आहे.
 4. माझ्या शाळेचे मुख्याध्यापक श्री. घोंगडे हे आहेत.
 5. श्री. घोंगडे सर खूप शिस्तप्रिय आहेत.
 6. माझ्या शाळेला खूप मोठे मैदान आहे.
 7. आम्ही मैदानात वेगवेगळे खेळ खेळतो.
 8. आमची शाळा सकाळी 8.00 वाजता भरते.
 9. सकाळी शाळा भरल्या नंतर राष्ट्रगीत गायले जाते.
 10. त्यानंतर प्रतिज्ञा व पसायदान घेतले जाते.
 11. त्यानंतर आम्ही सर्वजण सुविचार सांगतो.
 12. आमच्या शाळेच्या भिंतीवर खूप छान छान व प्रेरणादायी सुविचार लिहिलेले आहे.
 13. आम्हला मराठी चे शिक्षक श्री. पवार सर हे आहेत.
 14. आमच्या शाळेत दोन शिपाई काका आहेत.
 15. त्यांचे नाव श्री. माने व श्री. ठाकरे असे आहेत.
 16. शिपाई काका खूप काम करतात.
 17. शिपाई काका शाळेतील सर्व कार्यक्रमाची तयारी करतात.
 18. आमच्या शाळेत खेळाच्या स्पर्धा आयोजित केल्या जातात.
 19. त्यामध्ये आम्ही खूप आनंदाने सहभागी होतो.
 20. अशी ही माझी शाळा मला खूप आवडते.

माझी शाळा निबंध मराठी इयत्ता पाचवी

इयत्ता पाचवी च्या विद्यार्थ्यांसाठी माझी शाळा मराठी निबंध |Essay on My School in Marathi हा खाली वाचा.

आदर्श विद्यामंदिर हे माझ्या शाळेचे नाव आहे. माझी शाळा खूप छान आहे. शाळेच्या भोवती भरपूर मोकळी जागा आहे. शाळेच्या फाटकाजवळ एक सुंदर बाग आहे.

मागच्या बाजूला एक मोठे मैदान आहे. या मैदानातच आम्ही खेळतो. आमच्या कवायती येथे होतात. आमचे स्नेहसंमेलनही या मैदानातच होते.

आमच्या शाळेतील सर्व वर्गखोल्या मोठ्या आहेत. वर्गात भरपूर हवा व प्रकाश खेळत असतो. शाळेच्या भिंतीवर थोर व्यक्तींची छायाचित्रे लावलेली आहेत. शाळेच्या भिंतीवर छान छान सुविचार ही लिहिले आहेत. विविध माहितीचे तक्ते व चित्रे ही लावलेली आहेत.

आमच्या शाळेच्या ग्रंथालयात खूप पुस्तके आहेत. तेथे आम्ही सर्व बसून अभ्यास करता येतो.

आमच्या शाळेत प्रयोगशाळाही आहेत. तेथे दहावीची मुले प्रयोग करतात.

आमचे सर्व शिक्षक चांगले आहेत. ते छान शिकवतात. आमच्या शाळेत खेळांच्या व इतरही स्पर्धा नेहमी होतात. त्यामुळे शाळेत खूप आनंद मिळतो. माझी शाळा मला खूप आवडते.

माझी शाळा निबंध मराठी इयत्ता सातवी

इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी माझी शाळा मराठी निबंध |Essay on My School in Marathi हा खाली वाचा.

माझ्या शाळेचे नाव रेशमाई विद्यामंदिर, टिटवाळा हे आहे. मी इयत्ता सातवी या वर्गात शिकत आहे. माझी शाळा आमच्या घरापासून जवळच आहे.

आमच्या शाळेला मोठे मैदान आहे. त्या मैदानावर आम्ही मित्र – मैत्रीणी खो-खो, कब्बडी, क्रिकेट असे खूप छान छान खेळ खेळत असतो. आमच्या शाळेत खेळाच्या स्पर्धा आयोजित केल्या जातात. त्यामध्ये आम्ही सारेजण मोठ्या उत्साहाने भाग घेतो.

आमच्या शाळेला 5 शिक्षक आणि 3 शिक्षिका आहेत. ते सर्व आम्हाला खूप छान शिकवतात. आमच्या शाळेचे मुख्याध्यापक श्री. पवार सर आहेत. ते खूप शिस्त प्रिय आहेत.

आमच्या शाळेला एक बगीचा देखील आहे. त्यामध्ये रंगबेरंगी फुलांची झाडे आहेत. त्यांचा सुगंध खूप छान येतो. दरवर्षी जून व जुलै महिन्यात झाडे लावा झाडे जगवा या योजनेत आम्ही सहभागी होतो. आम्हाला झाडे लावणे व जगवणे यात खूप आनंद मिळतो.

आमच्या शाळेच्या ग्रंथालयात खूप पुस्तके आहेत. तेथे आम्ही सर्व बसून अभ्यास करता येतो.

आमची शाळा सकाळी 9.30 वाजता भरते. व संध्याकाळी 4.00 वाजता सुटते. शाळेत शिकायला आम्हाला खूप आवडते. अशी ही माझी शाळा मला खूप आवडते.

माझी शाळा माहिती | Essay on My School in Marathi

या लेखात आपण माझी शाळा माहिती | माझी शाळा मराठी निबंध |Essay on My School in Marathi याची माहिती बघणार आहोत.

माझ्या शाळेचे नाव श्री गणेश विद्यालय देवगाव रंगारी हे आहे. माझी शाळा कन्नड तालुक्यातील सर्वात चांगली शाळा आहे.

आमच्या शाळेत इयत्ता पहिली ते बारावी पर्यंतचे वर्ग आहेत. मी इयत्ता सातवी त शिकत आहे.

आमच्या शाळेत 6 शिक्षक व 9 शिक्षिका आहेत. ते सर्व आम्हाला खूप छान शिकवतात.

ते आमचे खूप लाड करतात. आणि हो गरज पडली तर मारही देतात. कारण आमचे सर्व शिक्षक खूप शिस्तप्रिय आहेत.

आमच्या शाळेच्या भिंतीवर सुंदर सुविचार लिहिलेले आहे.

आमच्या शाळेत प्रयोगशाळा देखील आहेत. त्यामध्ये इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थी प्रयोग करत असतात.

आमच्या शाळेला खूप मोठे मैदान आहे. मधील सुट्टीत आम्ही तेथे खो-खो, कबड्डी, क्रिकेट असे खूप छान-छान खेळ खेळतो.

आमची शाळा खूप सुंदर आहे. आमच्या शाळेत जायला मला खूप आवडते.

सारांश – माझी शाळा निबंध मराठी

शाळा ही आपल्या जीवनातील एक अविभक्त घटक आहे. आपल्या मुलांना घडवणारी ती एक प्रयोग शाळाच असते. आपल्याला शाळेत नेहमी माझी शाळा निबंध मराठी | Essay on My School in Marathi या विषयावर प्रश्न विचारले जातात. माझी शाळा हा विषय खूप मनोरंजक विषय आहे. आम्हला अशा आहे की आपल्या माझी शाळा मराठी निबंध |Essay on My School in Marathi या बद्दल आवश्यक माहिती मिळाली असेल. आमच्या mymarathiguru.com या ब्लॉग ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.

तुमच्या शाळेचे नाव काय आहे?

माझ्या शाळेचे नाव श्री. गणेश विद्यालय देवगाव रंगारी हे आहे.

शाळेत तुम्हाला काय शिकवतात?

शाळेत आम्हला आयुष्यात नेहेमी उपयोगी पडणाऱ्या गोष्टी शिकवल्या जातात.

2 thoughts on “माझी शाळा मराठी निबंध | Essay on My School in Marathi – Best”

Leave a Comment