Best Tourist Places in Pune District | पुणे जिल्ह्यातील पर्यटन स्थळे – पुणे हा जिल्हा महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय जिल्हा आहे. शिक्षणाचे माहेर घर असेही या जिल्ह्याची ओळख आहे. पुणे या जिल्ह्याने देशाला अनेक समाजसुधारक तसेच क्रांतिकारक ही दिले आहे. या ब्लॉग पोस्ट मध्ये आपण पुणे जिल्ह्यातील पर्यटन स्थळांची माहिती बघणार आहोत.
पुणे जिल्ह्यातील पर्यटन स्थळांची माहिती | Best Tourist Places in Pune District
पुणे – Best Tourist Places in Pune District
शैक्षणिक व सांस्कृतिक नगरी म्हणून सर्वज्ञात असलेले पुणे शहर असंख्य बाबींसाठी सुप्रसिद्ध आहे. पुणे या शहराला फार मोठा ऐतिहासिक वारसा आहे. येथील गणेशोत्सव विशेष प्रसिद्ध आहे. या काळात असंख्य पर्यटक शहराला भेट देतात.
आळंदी– Best Tourist Places in Pune District
“आळंदी हे गाव पुण्य भूमी ठाव” असं संत श्रेष्ठींनी ज्या नगरीचे वर्णन केलं ही आळंदी नगरी खेड तालुक्यात इंद्रायणी नदीच्या काठावर वसलेली आहे. येथे संत ज्ञानेश्वरांनी वयाच्या एकविसाव्या वर्षी संजीवन समाधी घेतली. येथील मंदिराच्या विस्तारास जागाच नाही. येथे सुप्रसिद्ध चित्रकार डी. डी. रेगे यांचे संत वस्तू धाम संग्रहालय आहे.
खंडाळा– Best Tourist Places in Pune District
मावळ तालुक्यात असलेले खंडाळा हे थंड हवेचे सुप्रसिद्ध ठिकाण होय. समुद्रसपाटीपासून सुमारे 1787 फूट उंचीवर असून सह्याद्रीच्या पश्चिम भागात येते. खंडाळ्याचा घाट बोरघाट येथून सुरू होऊन खोपोलीस संपतो.
मावळ तालुक्यात असणारे लोणावळा हे थंड हवेचे दुसरे ठिकाण आहे. लोणावळा या ठिकाणाची समुद्रसपाटीपासूनची उंची सुमारे 2000 फूट एवढी आहे. खंडाळा पेक्षा मोठे शहर आहे. येथील हवामान चांगले असल्याने या परिसरात अनेक सॅनेटरीयम्स आहेत. येथे एमटीडीसी तर्फे निवास व्यवस्था आहे.
- हे देखील वाचा- कोल्हापूर जिल्हा पर्यटन स्थळे
- हे देखील वाचा– औरंगाबाद जिल्ह्यातील पर्यटन स्थळे
लोणावळा येथे आयएनएस शिवाजी हे नौदल प्रशिक्षण केंद्र आहे. जवळच भुशी डॅम वळवण तलाव आहे. टाटाचे खोपोलीतील जलविद्युत निर्मिती केंद्र वळवन तलावातील पाण्यावर चालते. येथील चिक्की फार प्रसिद्ध आहे. लोणावळा-खंडाळा ही दोन्ही ठिकाणे पुण्यापासून 60 कि. मी. व मुंबईपासून 104 कि. मी. अंतरावर पुणे-मुंबई हमरस्त्यावर आहे.
पिंपरी चिंचवड – Best Tourist Places in Pune District
पुणे प्रमाणेच पिंपरी-चिंचवड ही एक स्वतंत्र महानगरपालिका आहे. पिंपरी चिंचवड परिसरात अनेक उद्योगधंदे आहेत. चिंचवड येथे गणेशभक्त मोरया गोसावी या संत पुरुषांची संजीवन समाधी आहे. दक्षिणवाहिनी पवना नदीच्या काठी वसलेले व चिंचवड यांनी व्यापलेले हे शहर पुण्यापासून अवघ्या 15 कि. मी. अंतरावर आहे.
चिंचवडच्या मोरया गणपती हे जागृत स्थान आहे. स्कूटर, रिक्षा, मोटार, कृत्रिम धागे, पेनिसिलीन, रसायने इत्यादींचे कारखाने येथे आहेत. जवळच नवीन इन्फोटेक पार्क वसाहत आहे. निगडी येथील अप्पू घर हे करमणुकीचे केंद्र आहे.
देहू – Best Tourist Places in Pune District
हवेली तालुक्यातील देहू हे गाव इंद्रायणी नदीच्या काठावर आहे. हे संत तुकारामाचे जन्म गाव असून येथे मोठी जत्रा भरते.
सासवड
पुरंदर तालुक्यातील एक प्राचीन नगर सासवड येथे ज्ञानेश्वरांचे वडील बंधू सोपानदेव यांची समाधी आहे. पुरंदर किल्ला आहे. सुप्रसिद्ध साहित्यिक आचार्य प्र. के. अत्रे यांचे जन्मस्थान आहे. येथे कस्तुरबा आश्रम आहे.
जुन्नर – Best Tourist Places in Pune District
जुन्नर हे तालुक्याचे मुख्य ठिकाण आहे. येथे सातवाहन काळात बांधलेला शिवनेरी किल्ला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म याच शिवनेरी किल्ल्यावर झाला होता। जुन्नर पासून जवळच माणिकडोह व येडगाव ही धरणे आहेत.
आर्वी – Best Tourist Places in Pune District
जुन्नर तालुक्यातील आर्वी हे ठिकाण आहे. येथे उपग्रहांकडून येणारे संदेश प्राप्त करण्याचे केंद्र आहे.
खोडद
जुन्नर तालुक्यातच खोडद हे ठिकाण आहे. खोडद येथे खगोलशास्त्राच्या अभ्यासासाठी मोठी दुर्बिण बसवलेली आहे. ही आशिया खंडातील सर्वात मोठी दुर्बिण आहे.
उरुळी कांचन
हवेली तालुक्यातील उरुळी कांचन हे ठिकाण आहे. येथे महात्मा गांधीजींनी स्थापन केलेली निसर्गोपचार केंद्र आहे. भारतीय ॲग्रो इंडस्ट्रीज फाऊंडेशन ही संस्था आहे. तसेच श्री शंकराचे मंदिर व सहलीचे ठिकाण आहे.
राजगुरुनगर
खेड तालुक्यातील राजगुरुनगर हे मुख्य ठिकाण आहे. हुतात्मा राजगुरूंचे जन्मस्थान म्हणून प्रसिद्ध.
चाकण
चाकण हे खेड तालुक्यातील एक ठिकाण होय. येथे एक सुप्रसिद्ध भुईकोट किल्ला आहे. येथे औद्योगिक वसाहत असून या परिसरात अनेक मोठे उद्योग उभे राहिले आहेत. तसेच येथे कांद्याची बाजारपेठही आहे.
बारामती – Best Tourist Places in Pune District
सद्यस्थितीत राजकीय पटलावर प्रमुख स्थानी असणार बारामती हे तालुक्याचे ठिकाण आहे. नदीकाठावर वसलेले हे शहर आहे. कवी मोरोपंतांच्या मोरोपंतांचे येथे वास्तव्य होते. श्री शरद पवार यांचं काठेवाडी हे गाव याच तालुक्यातलं उद्योग कृषी व्यापार सहकारी संस्था माहिती तंत्रज्ञान व जैवतंत्रज्ञान या बाबतीत अग्रेसर आहे. येथील श्री. सिद्धेश्वर मंदिर, विश्वेश्वर मंदिर, माळावरची देवी, चांद शहा वली दर्गा इत्यादी जागृत देवस्थाने आहेत.
बनेश्वर – Best Tourist Places in Pune District
पुण्यापासून 30 कि. मी. अंतरावर नसरापूर जवळ बनेश्वर हे स्थान वसले आहे. येथील शिवमंदिर बनेश्वर नावाने प्रसिद्ध आहे. पहिले बाजीराव पेशवे यांनी हे मंदिर बांधले असून या मंदिरा शेजारी पेशव्यांच्या वाड्याचे अवशेष आहे. निसर्गरम्य परिसरामुळे पर्यटक या ठिकाणी येतात.
बेट केडगाव
दौंड तालुक्यातील बेट केडगाव हे स्थान मर्यादापुरुषोत्तम श्रीरामांचे वनवासातील विश्रांतीचे ठिकाण म्हणून हे प्रसिद्ध आहे.
वढू (बु.) – Best Tourist Places in Pune District
शिरूर तालुक्यातील महत्त्वाचे ठिकाण वढू (बु.) हे गाव भीमा कोरेगाव पासून 03 कि. मी. अंतरावर आहे. वढू (बु.) येथील भीमा नदीच्या काठावर छत्रपती संभाजी राजांची समाधी आहे.
भाटघर
भोर तालुक्यातील भाटघर हे ठिकाण नदीची उपनदी असलेल्या वेळवंडी नदीवर बांधलेले लॉइड धरण येथे आहे. या धरणाच्या जलाशयास आता येसाजी कंक जलाशय असे नामाभिधान करण्यात आलेले आहे. पुण्यापासून साधारणत चाळीस किमी अंतरावर असलेले हे स्थान एक पर्यटन केंद्र म्हणून नावारूपाला आले आहे.
वालचंदनगर
इंदापूर तालुक्यातील वालचंदनगर महत्त्वाचे ठिकाण आहे. यथे साखर कारखान्यांसाठी लागणारी यंत्रसामुग्री तयार केली जाते. वालचंदनगर येथे प्लास्टिकचा कारखाना तसेच वनस्पती तुपाचा कारखाना आहे.
भोर – Best Tourist Places in Pune District
भोर हे तालुका मुख्यालयाचे ठिकाण आहे. भोर परिसरात अलीकडील काळात लहान मोठ्या अनेक उद्योगधंद्यांचे केंद्रीकरण झाले आहे. भोर येथे रंग मेनकापड कारखाने आहे.
खेड शिवापुर
हवेली तालुक्यातील खेड शिवापुर हे गाव या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांचे पिता शहाजीराजांनी इसवी सन 1636 ते 16 37 असे एक वर्ष ठेवले होते. त्यामुळे त्याला पावनभूमी मानतात. येथे कमर अली दरवेश हा सुप्रसिद्ध दर्गा आहे. हिंदू मुस्लिम धर्मियांचे हे श्रद्धास्थान आहे.
तुळापूर
भीमा, भामा व इंद्रायणी नद्यांच्या संगमावरील तुळापूर हे पवित्र ऐतिहासिक स्थान आहे. येथे इसवी सन 1689 मध्ये औरंगजेबाने संभाजी महाराजांचा वध केला.
नाणेघाट
कोकण आणि देश यांना जोडणारा प्राचीन घाट म्हणजेच नाणेघाट होय. नाणेघाट येथे हडसर व जीवधन हे किल्ले आहेत.
पानशेत
हवेली तालुक्यात पानशेत व वरसगाव ही जलाशय प्रसिद्ध आहेत. त्यापैकी पानशेत म्हणजे पुण्याहून सिंहगडला जाण्याच्या रस्त्यावर हे प्रचंड आकाराचे धरण आहेत. पुण्याला पाणीपुरवठा येथूनच होतो सन 1961 साली हे धरण फुटले व पाणी पुणे शहरात घुसले. पुण्याचे खूप नुकसान झाले. मनुष्यहानी झाली. वित्तहानी झाली. अनेक घरे पडली. अनेक महत्त्वाची कागदपत्रे नष्ट झाली. पुण्यातील नागरिकांना या धक्क्यातुन बाहेर यायला बराच काळ लागला. वाटेत नॅशनल डिफेन्स अकॅडमी आणि इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या दोन प्रमुख संस्था आहेत.
वडगाव
वडगाव हे मावळ तालुक्यातील मुख्य ठिकाण आहे. या ठिकाणी इसवीसन 1779 साली नाना फडणवीस व महादजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांचे तुंबळ युद्ध झाले. या युद्धात इंग्रजांचा दारुण पराभव झाला. असे हे इतिहास प्रसिद्ध स्थान आहे.
कामशेत
लोणावळा जवळच्या कामशेत या लहानशा गावी इतिहासाचार्य सरदेसाई राहत होते. येथे जुना राष्ट्रीय महामार्ग रेल्वे मार्ग व इंद्रायणी नदी काही अंतर एकमेकांना समांतर जाताना दिसतात. मुंबई-पुणे आगगाडीने प्रवास करताना हे विलोभनीय दृश्य दृष्टीस पडते.
तळेगाव दाभाडे– Best Tourist Places in Pune District
मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे हे ठिकाण होय. येथे रेल्वेस्थानक आहे. तसेच काच कारखाना व डोळ्याच्या दवाखान्यासाठी प्रसिद्ध आहे.
वेल्हे
वेल्हे तालुका मुख्यालयाचे ठिकाण आहे. येथून जवळच रायगड व तोरणा हे दोन किल्ले आहेत.
सारांश | Best Tourist Places in Pune District | पुणे जिल्ह्यातील पर्यटन स्थळे
आज या लेखात आपण पुणे जिल्ह्यातील पर्यटन स्थळे (Best Tourist Places in Pune District) बद्दल खूप मोलाची माहिती बघितली. पुणे जिल्हा हा पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या पर्यटन स्थळांची माहिती आपण बघितली. आम्हाला आशा आहे की आपल्याला आमचे प्रयत्न आवडले असतील. आमच्या mymarathiguru.com या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.
आपण खालील मुद्दे बघितले.
Best Tourist Places in Pune District – पुणे जिल्ह्यातील पर्यटन स्थळे
Best Tourist Places in Pune District – पुणे जिल्ह्यातील पर्यटन स्थळे