औरंगाबाद जिल्ह्यातील पर्यटन स्थळे|13 Best Tourist Places in Aurangabad

औरंगाबाद जिल्ह्यातील पर्यटन स्थळे|Best Tourist Places in Aurangabad – औरंगाबादला महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून ओळखले जाते. दोन जागतिक वारसा स्थळे वेरूळ व अजिंठा असलेला हा भारतातील एकमेव जिल्हा आहे. पर्यटकांसाठी पर्वणी असलेल्या या जिल्ह्यातील महत्त्वाची पर्यटक व आकर्षण केंद्र पुढीलप्रमाणे आहे. महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या औरंगाबाद जिल्ह्यातील धार्मिक व पर्यटन पर्यटन स्थळे यांची माहिती आपण या ब्लॉगमध्ये घेणार आहोत.

Contents hide

औरंगाबाद जिल्ह्यातील ऐतिहासिक पर्यटन स्थळे | Historical Places in Aurangabad

श्री. घृष्णेश्वर मंदिर, वेरूळ|Best Tourist Places in Aurangabad

शंकराच्या बारा ज्योतिर्लिंगापैकी हे बारावे ज्योतिर्लिंग आहे. दौलताबाद पासून 11 कि. मी. अंतरावर वेरूळ जवळ हे मंदिर आहे. गंगा नदी काठी हे मंदिर वसलेले आहे. मंदिराचा प्रथम जीर्णोद्धार मालोजीराजे भोसले यांनी केला. ई. स. 1960 साली हे मंदिर राष्ट्रीय संरक्षित स्मारक घोषित करण्यात आले. शिवपुराण, स्कंदपुराण, रामायण, महाभारत या ग्रंथांत या मंदिराचा उल्लेख आहे.

आपेगाव, तालुका पैठण

महाराष्ट्राची माउली म्हणून सुपरिचित वारकरी संप्रदायाचा पाया रचणारे व ज्ञानेश्वरी सारख्या रसाळ ग्रंथाची देणगी मराठी भाषेला देणारे संत ज्ञानेश्वर यांचे जन्मस्थळ औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील आपेगाव हे गाव आहे. गोदावरीच्या नदीकाठावर आपेगाव हे गाव आहे. या ठिकाणी संत ज्ञानेश्वर माऊली यांचे जन्मस्थान मंदिर आहे.

भद्रा मारुती मंदिर, खूलताबाद

वेरूळ लेणी पासून जवळच हे हनुमानाची जागृत स्थळ आहे. या ठिकाणाची मूर्ती निद्रिस्त स्थितीत आहे. भारतातील तीन निद्रीस्त मारुती देवस्थानांपैकी हे एक आहे. हनुमान जयंती व रामनवमी लाखो भक्त येथे दर्शनासाठी येतात प्राचीन काळी खुलताबाद भद्रावती नावाने ओळखले जात असे. भद्रसेन राजाची रामस्तुती ऐकण्यासाठी हनुमान या ठिकाणी भावसमाधी मध्ये स्थानापन्न आहे असे भाविक सांगतात.

पैठण |Best Tourist Places in Aurangabad

दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध गोदावरी नदी तीरावरील हे प्रसिद्ध धार्मिक स्थळ आहे. पैठण शहराचे प्राचीन नाव प्रतिष्ठान असे होते. संस्कृत आणि धर्मशाश्र यांचा अभ्यास या ठिकाणी अनादिकालापासून होत आहे. पैठण हे संत एकनाथ महाराजांची जन्मभूमी व कर्मभूमी आहे. श्री चक्रधर स्वामींचे वास्तव्य काही काळ पैठण येथे होते.

कचनेर

कचनेर हे पवित्र जैन क्षेत्र औरंगाबाद पासून 37 कि. मी. अंतरावर आहे त्याठिकाणी चिंतामणी पार्श्वनाथ भगवान मूर्ती आहे. मंदिराचा पाया भूमिगत असून हे मंदिर सुमारे अडीचशे वर्षे जुने आहे. चिंतामणी पार्श्वनाथ भक्तांची चिंता हरतो, अशी अख्यायिका आहे.

मुरुडेश्वर मंदिर

हे सुमारे साडेचारशे वर्षे प्राचीन भगवान शंकराचे मंदिर आहे. हेमांडपंथी शैलीचे व राष्ट्रकूट वस्तू शैलीचा उत्तम नमुना आहे. औरंगाबाद पासून 90 कि. मी. अंतरावर हे मंदिर आहे या ठिकाणी वार्षिक उत्सव असतो.

अन्वा शिवमंदिर

औरंगाबाद जवळ गोळेगाव नजीक हे प्राचीन शिवमंदिर आहे. बाराव्या शतकातील हे मंदिर असल्याचे सांगितले जाते. मंदिराचे खांब सुंदर कोरीव काम असलेले आहेत.

वेरूळ येथील लेणी | Best Tourist Places in Aurangabad

इसवी सन पाचव्या ते नवव्या शतकात वेरूळ येथील जगप्रसिद्ध लेणींची निर्मिती झालेली आहे. सुमारे दोन कि. मी. परिसरात पश्चिमाभिमुख 34 लेणी आहेत. खोदकाम आधी कळस मग पाया या क्रमाने झालेले आहे. लेणी क्रमांक 1 ते 13 बौद्ध लेणी आहेत. लेणी क्रमांक 14 ते 29 हिंदू लेणी आहेत. लेणी क्रमांक 30 ते 34 जैन लेणी आहेत. लेणी क्रमांक 16 कैलास मंदिर विशेष उल्लेखनीय आहे.

अजिंठा लेणी |Best Tourist Places in Aurangabad

अनेक शतके पडद्याआड असलेल्या या लेणीचा शोध ‘स्मित’ या इंग्रज अधिकाऱ्याने सन १८१९ मध्ये लावला. सिल्लोड तालुक्यातील फरदापुर जवळ या जगप्रसिद्ध लेणी आहेत. ही लेणी शृंखला सह्याद्रीच्या सातमाळा रांगेतील इंद्यांद्री शाखेत वसली आहेत. जातक कथांवर आधारित गुफा चित्रे हे या लेण्याचे मुख्य वैशिष्ट्य आहे. चालुक्य, वाकाटक, राष्ट्रकूट काळात लेण्यांची निर्माण झालेली आहे. पुरातत्व शास्त्रानुसार 9, 10, 12, 13 व 15-अ या लेणी हीनयान कालखंडात कोरल्या गेल्या असाव्यात, या सोडून एक ते 29 लेणी महायान कालखंडात वाकाटक राजांच्या राजवटीत कोरल्या गेल्या. अजिंठा लेणी वाघुर नदीच्या परिसरात आहे.

औरंगाबाद गुफा

या ठिकाणी बारा बौद्ध गुंफा मंदिरे आहे. शहरापासून दोन कि. मी. अंतरावरील टेकड्यांमध्ये ती वसलेली आहे. इसवी सन सहाव्या सातव्या शतकात हे खोदकाम झाले असावे. काही संशोधक या गुहांचा वेरुळ-अजिंठा गुफांशी संबंध असल्याचे सांगतात.

देवगिरी किल्ला (दौलताबाद) |Best Tourist Places in Aurangabad

औरंगाबाद पासून वायव्येस 11 कि. मी. अंतरावर देवगिरी (दौलताबाद) किल्ला आहे. हा यादवकालीन किल्ला असून त्याची निर्मिती 12 व्या शतकातील आहे. दौलताबाद किल्ला 1951साली राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित झाला. मुहम्मद बिन तुघलक याने दौलताबाद आपली राजधानी बनवली होती. देवगिरी शहर यादव राजाने वसविले मोहम्मद तुघलकाने देवगिरीचे दौलताबाद असे नामकरण केले.

पितळखोरा लेणी

पश्चिम घाटाच्या सातमाळा रांगेत त्या 14 प्राचीन लेणी आहेत. प्राचीन वास्तुकलेचा उत्तम नमुना आहेत. 14 पैकी चार लेणी चैत्य आहेत. व दहा लेणी विहार आहेत. सर्व लेणी हिनयान काळातील आहेत व चित्रकला महायान काळातील आहेत. कन्नड पासून 25 कि. मी. अंतरावर व वेरूळ पासून 40 कि. मी. अंतरावर लेणी आहेत.

गौताळा औट्रमघाट अभयारण्य

सातमाळा व अजिंठा डोंगर रांगात औरंगाबाद व जळगाव जिल्ह्यात या अभयारण्याचा विस्तार आहे. 1986 साली गौताळा औटराम घाट अभयारण्य घोषित करण्यात आले. हरिण नीलगाय रानमांजरे इत्यादी प्राणी येथे आढळतात. अंजन, चंदन, बेल, आवळा इत्यादी वनस्पती आढळते. गौताळा अभयारण्य औरंगाबाद पासून दहा कि. मी. अंतरावर आहे.

म्हैसमाळ |Best Tourist Places in Aurangabad

म्हैसमाळ हे मराठवाड्यातील एकमेव थंड हवेचे ठिकाण आहे. याला प्रती महाबळेश्वर देखील म्हणतात समुद्रसपाटीपासून 1061 मीटर उंचीवर हे ठिकाण वसलेले आहे. खुलताबाद पासून 12 कि. मी. अंतरावर हे ठिकाण आहे. याठिकाणी गिरजामातेचे प्राचीन मंदिर आहे.

खुलताबाद

खुलताबाद औरंगाबाद पासून 27 कि. मी. अंतरावर असलेले ऐतिहासिक शहर आहे. खुलताबाद संत भूमी म्हणून ओळखले जाते. या ठिकाणी अनेक सोपी संतांचे वास्तव्य होते.

बीबी का मकबरा |Best Tourist Places in Aurangabad

बीबी का मकबरा दक्षिणेतील ताजमहल म्हणून ओळखला जातो. औरंगजेबाचा मुलगा आजम शहाने त्याच्या आईच्या स्मरणार्थ १६७८ साली तो बांधला. ही वस्तू ताजमहलची साम्य असणारी आहे. वास्तुविशारद उस्ताद आता उल्लाह यांच्या देखरेखीत या वस्तू चे काम पूर्ण झाले आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाद्वारे दरवर्षी ऑक्‍टोबर महिन्यात येथे उत्सवाचे आयोजन केले जाते.

पानचक्की

जल ऊर्जेद्वारे धान्य दळण्यासाठी पानचक्की चा वापर केला जायचा. पानचक्की ची निर्मिती सतराव्या शतकात करण्यात आली. पानचक्की हे शांत व रमणीय स्थळ आहे.

ज्ञानेश्वर उद्यान पैठण |Best Tourist Places in Aurangabad

वृंदावन गार्डन च्या धर्तीवर या उद्यानाची निर्मिती करण्यात आली. जायकवाडी धरणाच्या परिसरात हे उद्यान वसलेले आहे. 125 हेक्टर क्षेत्रावर हे उद्यान पसरलेले आहे. विस्तीर्ण गवताळ गालिचे व कारंजे हे या उद्यानाचे आकर्षण आहे. शेकडो फळांची व इतर झाडे या उद्यानाची शोभा वाढवितात. मुलांसाठी खेळण्याची जागा व जलतरण तलावही या ठिकाणी आहे.

सिद्धार्थ उद्यान व प्राणी संग्रहालय

औरंगाबाद शहराच्या मध्यवर्ती हे उद्यान वसलेले आहे. याठिकाणी मुलांच्या खेळण्याची विविध साधने आहेत. विविध प्राणी या उद्यानाचे वैशिष्ट्य आहे. छोटेसे मत्स्यालय व कारंजे या ठिकाणी आहे.

52 दरवाजे

औरंगाबाद शहरास बावन्न दरवाजांचे शहर म्हणूनही ओळखले जाते. ५२ पैकी ०४ मुख्य व ०९ दरवाजे आज सुस्थितीत आहेत. भडकल गेट त्यापैकी सर्वात मोठा दरवाजा आहे. दिल्ली दरवाजा, पैठण दरवाजा, जालना गेट, रोशन गेट हे त्यापैकी काही महत्त्वाचे दरवाजे आहेत.

हिमरू शाल कारखाना

हिमरू हे औरंगाबाद चे प्रसिद्ध हस्तकला ने तयार केलेले वस्त्र आहे. जफर दरवाज्याजवळ हा कारखाना आहे. कापडावर विणकामासाठी सोने व चांदी चा धागा वापरला जातो. संपूर्ण भारतातच नव्हे तर जगात सर्वत्र हे वस्त्र प्रसिद्ध आहे. या वस्त्राचा उपयोग पैठणी तयार करण्यासाठी केला जातो.

सलीम अली तलाव व पक्षी अभयारण्य

औरंगाबाद येथे दिल्ली दरवाजा जवळ हिमायत बागेच्या समोर हा तलाव आहे. विविध पक्षांचे या ठिकाणी वास्तव्य आहे. पक्षीनिरीक्षक व निसर्गाची आवड असणाऱ्यांसाठी हा तलाव एक आकर्षण केंद्र आहे.

जायकवाडी धरण |Best Tourist Places in Aurangabad

जायकवाडी महाराष्ट्रातील सर्वात मोठा बहुउद्देशीय जलप्रकल्प आहेत. जायकवाडीच्या जलाशयास नाथसागर म्हणून ओळखले जाते. हे आशिया खंडातील सर्वात मोठे मातीचे धरण आहे. सुमारे 42 मीटर उंच व दहा कि. मी. लांबीचे धरण आहे. या धरणास 27 दरवाजे आहे बारा मेगावॅट क्षमतेचा जलविद्युत प्रकल्प या ठिकाणी आहे.

जायकवाडी पक्षी अभयारण्य |Best Tourist Places in Aurangabad

नाथ सागर जलाशय अंतर्गत सुमारे 30 छोटी बेटे आहेत. ही बेटे प्रवासी पक्षांचे आकर्षण आहे. सुमारे दोनशे प्रकारचे पक्षी स्थलांतरित 70 प्रजाती सह या ठिकाणी आढळतात खरंच फ्लेमिंगो विजन ब्राह्मणी हे पक्षी येथे येतात.

सारांश | Conclusion – Best Tourist Places in Aurangabad

2 thoughts on “औरंगाबाद जिल्ह्यातील पर्यटन स्थळे|13 Best Tourist Places in Aurangabad”

Leave a Comment