माझी आजी मराठी निबंध | majhi aaji nibandh in marathi

माझी आजी मराठी निबंध | majhi aaji nibandh in marathi – नमस्कार माझ्या विद्यार्थी मित्रानो, आज आपण या माझी आजी निबंध मराठीतून बघणार आहोत. आजी ही घरातील एक आधारस्तंभ असते. तिची माया अपरंपार असते. अशा या मायाळू आजी बद्दल एक निबंध आपण पाहणार आहोत.

आम्ही या ब्लॉगच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी मराठी भाषेत आणि सोप्या शब्दात निबंध उपलब्ध करून देत आहोत.

आम्हाला आशा आहे की आपल्याला माझी आजी हा मराठी निबंध नक्की आवडेल.

माझी आजी मराठी निबंध | majhi aaji nibandh in marathi

माझी आजी आता साठ वर्षांची झाली आहे. तिचे केस पिकले आहेत. पण ती अजूनही घरात भरपूर काम करते.

आई बरोबर स्वयंपाक करते. स्वयंपाक आटोपल्यावर ती न्याहारी घेते. तोपर्यंत आई बाबा कामावर निघून जातात. त्यानंतर ती मला उठवते. मला आंघोळ करायला लावते आणि मग मला न्याहारी देते.

न्याहारी झाल्यानंतर आजी मला अभ्यासाला बसवते. मी अभ्यास करताना आजी माझ्या बाजूला बसते. मला पाठ्यपुस्तक मोठ्याने वाचायला लावते.

कधी कधी आजी मला तिच्या शाळेतल्या गोष्टी सांगते. संध्याकाळी आजी तिच्या मैत्रिणींबरोबर गप्पा मारत बसते.

घरी आल्यावर ती आईला स्वयंपाकात मदत करते. कधी कधी आई-बाबा माझ्यावर रागावतात तेव्हा आजी आई-बाबांची समजूत काढते. त्यावेळी आई बाबा तिचे ऐकतात. त्यामुळे माझी आजी मला खूप आवडते.

माझी आजी निबंध मराठी 10 ओळी | 10 lines on majhi aaji in marathi

  1. माझ्या आजीचे नाव शकुंतला देवी आहे.
  2. माझ्या अजीचे वय आता 65 वर्ष आहे.
  3. माझी आजी माझ्यावर खूप प्रेम करते.
  4. माझी आजी सकाळी लवकर उठते.
  5. सकाळी लवकर उठल्यावर ती प्रथम अंघोळ करते व नंतर देवाची पूजा करते.
  6. आईने चहा नाष्टा बनवून दिल्यावर आजी नाष्टा करते.
  7. माझी आजी आईला स्वयंपाक करण्यास मदत करते.
  8. माझी आजी मला शाळेत सोडायला माझ्याबरोबर येते व मला न्यायला ही येते.
  9. माझी आजी माझे खूप लाड करते. ती मला चोकलेट आणि खाऊ घेऊन देते.
  10. अशी ही माझी आजी मला खूप आवडते.

माझी आजी निबंध मराठी 10वी

माझी आजी निबंध मराठी 10वी – या लेखात आपण 10 वीच्या विद्यार्थ्यांसाठी माझी आजी मराठी निबंध लिहिणार आहोत.

माझी आजी या विषयाबद्दल निबंधाचे काही मुद्दे आपण या ठिकाणी बघणार आहोत.

माझी आजी निबंध

माझ्या आजीचे नाव कस्तुरबा रामराव जाधव हे आहे. माझी आजी आता 62 वर्षांची झाली आहे. मागच्याच आठवड्यात अजीचा 62 वां वाढदिवस आम्ही सर्वांनी खूप धूम धडाक्यात साजरा केला.

आमच्या घरातील आधारस्तंभ म्हणजे आमचे आजी – आजोबा हे होय. आमचे आजोबा देखील आता 68 वर्षांचे झाले आहेत.

माझी आजी खूप मायाळू आहे. तिला लगेच कोणाचेही दुःख बघवले जात नाही. ती आमचे खूप लाड करते. आम्हाला बाजारातून खाऊ, चॉकलेट, जिलेबी आणि मिठाई खायला आणते.

माझ्या आजीचा स्वभाव खूप प्रेमळ आहे. ती घरकामात आईला नेहेमी मदत करते. आई बाबा कामावर गेल्यावर घरातील सर्व काम आजीच करते.

आजी माझ्या लहान भावाला शाळेत सोडायला जाते व आणायला ही जाते. आम्ही शाळेतून आल्यावर आजी आमचा अभ्यास घेते. आजी आमचे लाड करते पण तसेच वेळ पडल्यावर मारही देते. पण ते आमच्यासाठीच चांगले आहे.

माझी आजी संध्याकाळी तिच्या मैत्रिणीबरोबर गप्पा गोष्टी करते. संध्याकाळी आजी दिवाबत्ती करते व हरिपाठ ही म्हणते. आजी रात्रीचे जेवण बनवून ठेवते. आई आणि बाबा आल्यावर आजीला सांगतात ” आई काय गरज होती एवढ करण्याची आम्ही केला असता स्वायमपाक” पण आजी ती आजीच ती खूप कष्टाळू आहे.

माझी आजी रोज रात्री झोपण्यापूर्वी आम्हाला छान छान गोष्टी सांगते. रामायण व महाभारत यांमधील विर योध्यांची गोष्ट ती सांगते. आम्ही आजीच्या गोष्टी ऐकता ऐकता च झोपून जातो.

अशी ही आमची आजी खूप चांगली आहे. आजी ही मायेचा सागर आहे. आजी आजोबा आमच्या घराचे आधारस्तंभ आहेत. अशी ही आजी आम्हाला खूप आवडते.

माझी आजी मराठी निबंध 50 शब्दात

माझी आजी आता 70 वर्षांची झाली आहे. तरीही ती अजून खूप मजबूत आहे. काम करताना ती माझ्या आईला सुद्धा मनात नाही.

माझ्या आजीचे नाव रमाबाई जाधव हे आहे. ती लुगडं नेसते. एवढे वय असून सुद्धा आजी इतरांसारख हातात काठी घेत नाही. तिला गरजच पडत नाही.

माझ्या आजीच्या हातचे जेवण खूप स्वदिष्ठ असते व ते मला खायला खूप आवडते. आजीच्या हाताच्या भाकर वड्या मला खूप आवडतात.

माझ्या आजीवर माझा खूप जीव आहे. ती घरात नसली की घर खलिखली से वाटते. अशी ही आजी मला खूप खूप आवडते.

सारांश | majhi aaji nibandh in marathi

वरील लेखामध्ये आपण माझी आजी मराठी निबंध | majhi aaji nibandh in marathi याबद्दल सविस्तर माहिती बघितली आहे. आम्हाला आशा आहे की ही माहिती आपल्याला नक्की आवडली असेल. यांच्या mymarathiguru.com या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल आपले धन्यवाद.

 

2 thoughts on “माझी आजी मराठी निबंध | majhi aaji nibandh in marathi”

Leave a Comment